क्राइम
कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून……!

केज दि.७ – कुऱ्हाडीचा वार करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. ही घटना केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्तीवर आज (दि. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरती भगवान थोरात (वय २७) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर भगवान शाहूराव थोरात असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. भगवान स्वतः युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.