बीड दि.२५ – कोरोना रुग्णांच्या संख्येचा बीड जिल्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आज आलेल्या रिपोर्ट्स मध्ये आणखी 37 रुग्णांची भर पडली असून यामध्ये बीड 15, परळी 11, अंबाजोगाई 6, गेवराई 4 तर केज तालुक्यातील बनसारोळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान बन सारोळा येथील रुग्ण हा हैदराबाद येथून आल्यानंतर गावाकडे न येता अंबाजोगाई येथे ऍडमिट झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली.त्यामुळे बनसारोळा येथील नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले आहे.