ब्रेकिंग
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : ठाकरे गटाची याचिका फेटाळली….!
नविदिल्ली दि.१७ – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं आज एका मुद्द्यावर निकाल दिला. यामध्ये ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. त्यामुळं ठाकरे गटाची निराशा झाली आहे. त्यामुळं हे प्रकरण आता सात सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता पुढील सुनावणी २१ आणि २२ फेब्रुवारीला होईल, असं कोर्टानं सांगितलं.