ब्रेकिंग

उत्तरेश्वर पिंप्रीच्या यात्रेत मोबाईल चोरांचा सुळसुळाट…..!

9 / 100

केज दि.१८ –  तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे भव्य दिव्य यात्रा भरते. जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. आणि स्वाभाविकच गर्दी होते. मात्र याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरांची टोळी त्या गर्दीमध्ये घुसते आणि मोबाईल सह इतर साहित्याची चोरी करून पसार होते, त्यामुळे यात्रेला कुठेतरी गालबोट लागते. केज

                 तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे महादेवाची यात्रा भरते. लाखो भाविक संपूर्ण महाराष्ट्रा मधून या यात्रेसाठी येतात. वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आणि आणि मनोरंजनाची साधने याठिकाणी उपलब्ध होत असल्याने आबालवृद्ध या यात्रेला येतात. मात्र याच गर्दीचा गैरफायदा घेत काही विघ्नसंतोषी लोक यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. कांही मोबाईल चोर यात्रेमध्ये घुसतात आणि भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारतात. तशीच काहीशी घटना आज यात्रेमध्ये घडली असून यात्रेतील अनेक भाविकांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत. त्यापैकी काही भाविकांनी तिघा मोबाईल चोरांना पकडले आणि केज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यामध्ये ज्ञानेश्वर गायकवाड, बालाजी भांगे, त्याचबरोबर आसाराम केदार, योगेश स्वामी या भाविकांचे मोबाईल चोरीला गेले असून त्यांनी तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत तक्रार नोंदवली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close