क्राइम
रिक्षासह रिक्षा चोर घेतला ताब्यात….!

केज दि.२७ – पोलीस ठाण्याच्या डीबी पथने एका रिक्षा चोरास रिक्षासह पकडले असून त्यास केज ठाण्यात आणले आहे.
लातूर येथील संजय बाबुराव वायकर यांनी आपला रिक्षा लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेला असताना सोमवारी अकराच्या सुमारास लातूर येथीलच अक्षय प्रभाकर कणसे याने सदरील रिक्षाची वायर तोडून रिक्षा चालू केला. आणि लातूरहून आंबेजोगाई व आंबेजोगाई केज अशा मार्गे जात होता.
सदर घटनेची केजच्या डीबी पथकाला माहिती मिळताच पीएसआय राजेश पाटील त्याचबरोबर पोलीस कर्मचारी राम यादव, हनुमंत गायकवाड श्री. गीते यांनी केजच्या केज कळंब रोडवर सापळा रचला व अक्षय कणसे यास रिक्षासह ताब्यात घेतले. सदरील प्रकरण हे अतिशय गंभीर असून या अगोदर त्याने इतर काही वाहने चोरले आहेत का याची माहिती पोलीस घेत आहेत.