#Social
प्रा. शहादेव वीर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…..!

बीड दि.२८ – तालुक्यातील पाली येथील रहिवाशी तथा साक्षळपिंप्री येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक शहादेव भगवान वीर यांना राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त आदर्श पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सदरील पुरस्कार जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने देण्यात आला. यशवंत रत्न राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला. सदरील पुरस्कार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तसेच श्रीमंत भूषण राजे होळकर इंदोर यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार 24 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना देण्यात येतो.
यावेळी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.