#Social
राहुलभैय्या सोनवणे, आश्वासक, दमदार नेतृत्व…….!
राहुलभैय्या सोनवणे ग्रामीण भागातील अतिशय सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व म्हटले तर वावगे ठरणार नाही. राहुलभैय्या सोनवणे हे
मातृछत्र खासदार सौ. रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोकदादा पाटील यांनी अतिशय आपुलकीने वाढवलेले युवा नेतृत्व आहे. राहुलभैय्या हे पाटील कुटुंबीयांचे मन जिंकलेला कार्यकर्ता असले तरी काँग्रेसी विचारधारा जपणारा सच्चा कार्यकर्ता आहे. राहुलभैय्या हे आजमितीला बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपदी विराजमान आहेत. कुशल संघटक, आक्रमक तेवढेच अभ्यासू नेतृत्व आहे. राहुलभैय्या यांची कर्यशैली वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येकाच्या मनात घर करणारे राहुलभैय्या युवकांसाठी आदर्श ठरत आहेत. अल्पावधीत नजरेत भरणारे काम त्यांनी उभे केले आहे.
राहुलभैय्या यांची अष्टपैलू कार्यपद्धती सर्व जाती धर्मांना समान न्याय, सामाजिक जाणिवेतून वागणूक देत एक आदर्श नेतृत्व म्हणून सिद्ध होताना अभिमानच वाटतो. राहुलभैय्या सोनवणे हे नाव आता केज ते दिल्लीपर्यंत सुपरिचित आहे. त्यांचा स्वभाव व त्यांचे आचरण वेगळं समीकरण अफलातून आहे. वैयक्तिक जीवनात आनंदी राहणे हे त्यांच्याकडून शिकावे. उत्कृष्ट नेतृत्व, कुशल संघटक असून दमदार नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यात दिसून येते. राहुलभैय्या म्हणजे मनाने खूप हळवं, प्रेमळ व प्रांजळ आणि प्रामाणिक असणारे नेतृत्व आहे. एखाद्या कार्यकर्त्याला दिलेल्या शब्द आत्तापर्यंत त्यांनी कधीही मोडला नाही. तरुण वयातही राहुलभैय्या यांच्याकडे परिपक्व नेतृत्वाची क्षमता आहे.
कार्यकर्त्याच्या प्रत्येक सुख दुःखात राहुलभैय्या जातीने लक्ष घालतात, याचे अनेक उदाहरणे आपल्याला ऐकवयास मिळतीलच, परंतु सामान्य लोकांच्या मदतीला धाऊन जाणे, सामान्य कुटुंबातील लग्नसमारंभात मदत करणे, दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देणे, इतर अडीअडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे राहुलभैय्या यांचे दैनंदिन काम असते. अगदी तळागाळातून काम करून थेट दिल्लीपर्यंतचा प्रवास करणे निश्चित गुणवत्तेचे प्रतीक आहे. राहुलभैय्या यांनी ते सिद्ध करून दाखवले आहे, त्यात तिळमात्र शंका नाही. सन्माननीय भैय्या साहेब आपल्या जीवनात आरोग्यसंपदा, राजकीय आणि सामाजिक जीवनात याहीपेक्षा अधिक झेप घ्याल, ही मनोकामना.
वाढदिवसानिमित्त आपले अभिष्टचिंतन करताना आपणास आभाळभर शुभेच्छा.
दत्ता भाऊ कांबळे
( लेखक हे जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत.)