क्रीडा व मनोरंजन
विष्णू घुलेंकडून पैलवान तानाजी चौरेचा सत्कार…….!

केज दि.११ – पैलवान तानाजी चौरे याने कोल्हारवाडी ( जि. बीड ) येथील कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्धी पैलवानास चितपट करीत अंतिम कुस्ती जिंकून शिवगिरी केशरी ही ५ किलो चांदीची गदा मिळविली. त्याबद्दल भाजपचे युवानेते विष्णू घुले यांनी त्यांचा सत्कार केला.
कोल्हारवाडी ( ता. जि. बीड ) येथे ग्रामस्थांच्या वतीने यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा ठेवल्या होत्या. या स्पर्धेत केज तालुक्यातील जिवाचीवाडी ( तुकुचीवाडी ) येथील पैलवान तानाजी मुरली चौरे या १९ वर्षीय तरुणाने प्रतिस्पर्धी पैलवनास चितपट करीत शिववगिरी केशरी ही ५ किलो चांदीची गदा मिळविली. त्याबद्दल विष्णू घुले यांनी गावात जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रशिक्षक अनंत चौरे, दिनकर चंदनशिव, आश्रुबा घुले, दिगंबर मुंडे, गणेश घुले यांच्यासह परिसरातील पैलवान, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.