हवामान
वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट, पिकांचे मोठे नुकसान…..!

बीड दि.१८ –
गुरुवारी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणा गारपिटीसह पाऊस झाला. अगदी मोसमी पावसासारखा पाऊस झाल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आणि आज गारपिटीने बीड जिल्हा झोडपला असून माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यातील उपळी, गावंदरा, कारी, कुप्पा इत्यादी भागातक मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. तर केज तालुक्यातील कांही भागात अवकाळी बरसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे.