#Social
रमेश गुळभिले यांची निवड…..!
केज दि.१८ – तालुक्यातील रमेश गुळभिले यांची महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ केज तालूका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर, कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे, उपाध्यक्ष ऍड.घाईतिडक, सरचिटणीस मुबशीर खतीब यांच्या उपस्थितीत रमेश गुळभिले यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, श्री.गुळभिले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, माहिती अधिकार फेरडेशनच्या संपूर्ण नियम, अटी व आचारसंहिता यांचे काटेकोर पणे पालन करून या पदावर जबाबदारीने काम करीन. तसेच पदाचा कुठलाही गैरवापर करणार नाही.तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रमेश गुळभिले यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल केज तालुक्यातील मित्र परिवारा कडून अभिनंदन केले जात आहे.