ब्रेकिंगमहाराष्ट्र
अखेर कर्मचारी परतणार कामावर…..!

(पहा केज शहरातील कायमची डोकेदुखी)
मागच्या सात दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जो संप सुरू होता तो संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कर्मचारी समन्वय समितीने चर्चा केली आणि ती चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या आणि नव्या पेन्शन मधील अंतर कमी करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून सर्वांना समान वेतन लागू करण्याचे आश्वासनही दिल्याने संप मागे घेण्यात आल्याची घोषणा कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी विश्वास काटकर यांनी केली आहे.
दरम्यान, शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांनी संप जरी मागे घेतला असला तरी राजपत्रित अधिकारी मात्र आपला निर्णय उद्या जाहीर करणार आहेत.