क्राइम

अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी केज पोलिसांनी केला जेरबंद……!

9 / 100

केज दि.२५ – अल्पवयीन मुलीवर जवळच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याच्या तणावातून पीडित मुलीच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती. अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केज तालुक्यातील एका वस्तीवर बहिणीला भेटण्याच्या बहाण्याने येत असलेल्या सुनेच्या भावाने आपल्याच बहिणीच्या अल्पवयीन नणंदेवर घरात कोणी नसल्याची संधी साधून लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना समजताच पीडित मुलीच्या आईने समाजात बदनामी होईल या भीतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान राहत्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गणेश सुरेश काळे याच्याविरुद्ध अत्याचार व पोस्कोचा गुन्हा केज पोलिसात दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता.

दरम्यान, २५ मार्च रोजी सदर आरोपी हा येळंब येथे आल्याची गुप्त माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, तपासी अधिकारी फौजदार सिमाली कोळी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, शिवाजी कागदे यांच्या पथकाने अचानक छापा मारून अटक केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close