आरोग्य व शिक्षण

सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेत असाल तर थांबा……!

नवीन संशोधनात धक्कादायक माहिती समोर.....!

6 / 100
अनेकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी या सारखी समस्या सतावते. अशा स्थितीत बहुतेक वेळा आपण डॉक्टरांकडे जाणं टाळतो आणि त्रास दूर करण्यासाठी घरीच पॅरासिटामॉल (Paracetamol), इबुप्रोफेन (Ibuprofen) किंवा कोडइन (Codeine) यासारख्या औषधांचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करतो. तुम्हीही असं करत असाल तर, थांबा. वारंवार पॅरासिटामॉलचे सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक असून ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.
                     नवीन संशोधनात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासात अशा औषधांच्या वापराबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणताही विचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल आणि त्यासारख्या औषधांचं सेवन करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी आहे. काही लोक सौम्य वेदना असल्यास कोणताही विचार न करता मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि स्वतः पॅरासिटामॉल घेतात. पण हे करणं अत्यंत चुकीचं असून याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम  होऊ शकतो. पॅरासिटामॉल तुमच्या वेदना तेवढ्यापुरत्या वेळेसाठी दूर करतं पण, हे आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक आहे.
               The BMJ मध्ये 22 मार्च 2023 रोजी प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही मोठी माहिती समोर आली आहे. या संशोधनात एकूण 15,134 लोकांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासात 69 वेगवेगळ्या औषधांच्या परिणामांचं निरीक्षण करण्यात आलं. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने शरीरशास्त्रीय उपचारात्मक रासायनिक प्रणालीतील गैर-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे, पॅरासिटामॉल, ओपिओइड्स, अँटीकॉनव्हलसंट्स, अँटीडिप्रेसंट्स, स्नायू शिथिल करणारे किंवा कॉर्टिकोस्टिरॉईड्स यांचा समावेश केला होता. या संशोधनात आढळून आलं की, पेनकिलर म्हणजे वेदनाशामक औषधांमुळे वेदना कमी होतात पण, त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. या औषधांचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टिमवर दुष्परिणाम होऊन यामुळे मळमळ, अपचन, उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसून आली. थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखी यासारख्या मज्जासंस्थेशी संबंधित समस्याही दिसून आल्या. विशेषतः ज्या लोकांना पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होत्या आणि त्या लोकांनी या औषधांचं जास्त सेवन केल्याचंही संशोधनात समोर आलं आहे.
           दरम्यान, पाठदुखी आणि ऑस्टियो आर्थरायटिसच्या उपचारांसाठी पॅरासिटामॉल घेतल्याने जीवनशैलीत सुधारणा होत नाही. वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलचा प्रभाव तितका प्रभावी नव्हताच, असं संशोधनात समोर आलं. या औषधाच्या जास्त वापरामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो, असंही संशोधकांनी सांगितलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close