संपादकीय
माहेश्वरी सभेच्या तालुकाध्यक्ष पदी मनीष जाजू…..!

केज दि.२७ – तालुका माहेश्वरी सभेच्या 2022 ते 2025 या कार्यकाळासाठी तालुका अध्यक्षपदी मनीष जाजू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
श्रीनिवास सोनी यांच्या निवासस्थानी दिनांक 25 मार्च रोजी रमेशचंद्र बाहेती यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये तालुकाध्यक्षपदी मनीष जाजू, उपाध्यक्षपदी अमरदीप बाहेती, सचिव पदी सचिन भुतडा तर कोषाध्यक्षपदी संतोष बियाणी यांची निवड करण्यात आली.
यावेळी माहेश्वरी युवा मंडळाचे अध्यक्ष भरत तोष्णीवाल यांच्यासह बालाप्रसाद इंदाणी, नंदकिशोर सोनी, शिव सोनी, संतोष रिणवा, संतोष तोष्णीवाल, सतीश भराडीया व सर्व युवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.