#Social
श्रीमद् भागवत कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा – अभिजीत राऊत….!
केज दि.२७ – तालुक्यातील चिंचोली माळी येथे कै. प्रकाशभाऊ आश्रूबा राऊत यांचे प्रथम वर्षश्राद्ध व चंद्रकांत आश्रुबा राऊत यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक 26 मार्च 2023 ते रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 पर्यंत ह. भ. प. केशव महाराज शास्त्री यांची श्रीमद् भागवत कथा आयोजित केली आहे.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी कै. प्रकाश भाऊ आश्रुबा राऊत यांचे राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान असलेलं व्यक्तिमत्व यांचं गेल्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. “कष्टातून केली आयुष्याची सुरुवात… सर्वावर फिरविला मायेचा हात… सुख जवळ येताच काळाने फिरविली पाठ… जन्मोजन्मी पाहू आम्ही चातका प्रमाणे वाट या संत उक्ती प्रमाणे ते अचानक आपल्यातून निघून गेले. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त व त्यांचे लहान बंधू चंद्रकांत आश्रुबा राऊत यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक 26 मार्च ते रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 सायंकाळी 8 ते 10 या काळात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार ह. भ. प. केशव महाराज शास्त्री, भगवान श्रीकृष्ण आश्रम केज, यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्यास मिळणार आहे. तर रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत वैराग्यमूर्ती रंधवे बापू महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.
तरी सर्व कार्यक्रमाचा गावातील व परिसरातील भाविक भक्त व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमोल प्रकाश राऊत, अभिजीत चंद्रकांत राऊत व रणजीत चंद्रकांत राऊत यांनी केले आहे.