#Social
संकटे चारी बाजूने येतात त्याचे ज्वलंत उदाहरण…..!
केज दि.२८ – तालुक्यातील पैठण येथील सर्वसामान्य कुटुंबातील शेतमजूर जयराम हरिभाऊ चौधरी हे शेळ्या चारत असताना शेळ्यांना झाडपाला तोडण्यासाठी झाडावर चढले असता झाडावरून पडल्याने गंभीर इजा होऊन कमरेपासून खालचा भाग निकामी झाला. तेंव्हापासून ते अंथुरणावर पडून आहेत. आणि त्यातच पुन्हा भविष्याची आशा असलेला पोटचा गोळा दुर्दैवाने काळाने हिरावून नेला.
उपचारासाठी अनेक दवाखाने पालथे घातले. मात्र सरकारी दवाखान्यात उपचार झाले नाहीत म्हणून बार्शी येथे उपचारासाठी दहा लाख रुपये खर्च करून आज हे कुटुंब कर्जबाजारी झाले आहे. कसल्याच प्रकारचे काम करता येत नसल्याने आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. त्यामुळे एक माणुसकी म्हणून पुढील औषध उपचारासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा. जीवंत माणसाच्या कुटुंबाला आत्ताच खरी गरज आहे. दानशूरांनी जमेल तेवढी मदत करायला हवी. अगोदरच आजार आणि त्यात पुन्हा शेततळ्यात बुडून पोटचा गोळा गेल्याने ते पुरते खचले आहेत. त्यामुळे कुटुंबातील कर्ता पुन्हा उभा राहण्यासाठी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे.
दरम्यान मदतीसाठी खालील खाते क्रमांक असलेल्या फोन पे, गुगल पे यावरून मदत करता येऊ शकते.
चला माणूस वाचवूया, काडीचा आधार देऊया……!
(डॉ.उत्तम खोडसे यांनी समाज माध्यमांवर केलेले आवाहन)
राजा हरिभाऊ चौधरी (मदतीसाठी)
फोन पे, गूगल पे 9657546023