ब्रेकिंग
ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मोठी कारवाई…..!

मुंबई दि.२८ – वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसला आहे. वकिलांच्या आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांकरिता वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. ऍड. सुशील मंचरकर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने ही कारवाई करताना दोन वर्षांसाठी त्यांची वकीलीची सनद रद्द ठरवली आहे. त्यामुळे त्यांना आता वकीली करता येणार नाही दोन वर्षांची कारवाई केल्याची माहिती ऍड. मंचरकर यांना आणि बार काऊंसिल ऑफ इंडियालाही पत्राद्वारे कळविण्यात
आले आहे.