क्राइम

सावधान…! नशा करण्यासाठी वापरल्या जातेय ”हे” औषध…..!

6 / 100
बीड दि.२९ – तरुणाई मोठया प्रमाणावर व्यसनाधीन होताना दिसत आहे.नशा करण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा वापत केला जातो.आणि असाच एक धक्कादायक प्रकार बीड पोलिसांच्या विशेष पथकाने समोर आणला असून यामध्ये चक्क खोकल्याचे औषध नशा करण्यासाठी वापरल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
             अधिक माहिती अशी की, पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कंकालेश्वर मंदिर परिसरात छापा मारला असत शेख फैजान शेख मकसूद उर्फ सोनू रा. शहंशाहअली दर्गा पेठ बीड याला जागीच पकडून त्याच्याकडून  codein phosphate chlorpheniramine maleate syrup  या औषधाच्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 1353 रुपये किमतीच्या 11 बाटल्या जप्त केल्या. यावेळी औषध प्रशासनचे औषध अधिकारी श्री. दुसाने यांना पाचरण करून त्यांच्याकडून सदर औषधांचे प्रोडक्शन आणि बॅच नंबर्स याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला. तर यामध्ये फैयाज शेख आणि  मोहसीन खान हिमायत अली खान रा. दाऊतपुरा कंकलेश्वर मंदिराजवळ पेठ बीड (फरार) या दोघां विरुद्ध  त्यांनी बेकायदेशीरपणे स्वतःच्या फायद्यासाठी औषधांचा अवैद्य साठा करून मानवी जीवनात व शरीरास अपायकारक असल्याचे व त्याचा नशेसाठी वापर होत असल्याची जाणीव असताना सुद्धा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला म्हणून पेठ बीड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
            सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सपोनी विलास हजारे तसेच पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू यांनी केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close