धारूर तालुक्यातील कोळपिंपरी येथील बाळासाहेब राऊत आणि त्यांच्या पत्नी संगीता बाळासाहेब राऊत (४३) हे दोघे दि.26 मार्च रोजी धारूरहुन केजकडे मोटरसायकलवर येत होते. सकाळी 11.30 च्या दरम्यान ते धारूर रोडवरील सब स्टेशन समोर आले असता संगीता राऊत ह्या अचानक मोटार सायकल वरून रोडवर पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. सदरील अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ लातूर येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सदरील अपघात हा त्यांची गाडी गतिरोधक वर आदळून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र कारण काहीही असो यामध्ये संगीता राऊत यांना आपला जीव गमवावा लागला आहे.