संपादकीय
युसुफवडगांव येथे रामनवमी निमित्त भाविकांची अलोट गर्दी….!
केज दि.३० – (सचिन उजगरे) : तालुक्यातील युसुफवडगांव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवस सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात” दशरथनंदन श्रीरामचंद्र महाराज की जय ” असा जयघोष करीत भाविकांनी भरलेल्या १२ गाड्या ओढण्याची परंपरा कायम ठेवली.
युसूफवडगांव येथे अतिशय प्राचीन राम मंदीरात प्रभू रामचंद्रासोबत सीता माता,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न,आणि मारुती या देवतांच्या पंचधातुच्या मुर्ती आहेत.मंदिरात चैत्रशुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केल्यानंतर दशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गुरूवारी रामनवमी निमित्त पहाटे सर्व मुर्तींना अभिषेक घालून दुपारी प्रभुरामांची मुर्ती एका सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली.राममंदिरात श्रीधर महाराज रामदासी यांचे नार्दिय गुलालाचे किर्तन झाले.दुपारी बारा वाजेच्या सुमारास दशरथनंदन रामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत गुलाल पुष्प उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर गावातून रामचंद्रांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक वेशीमध्ये आल्यावर १२ बैलगाड्या एकमेकांना बांधून भाविकांनी भरलेल्या या गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.पुण्याहून आणलेल्या ढोलताशा पथकाने भाविकांचे लक्ष वेधले.गाड्या ओढण्याचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गावातील व परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
श्रीराम ग्रुप व स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप..
युसुफवडगांव येथे सध्या श्रीराम नवमी जन्मोत्सव व भव्य याञा महोत्सव चालु असुन आज पहिल्या दिवशी रामजन्म सोहळ्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना श्रीराम ग्रुप पुणे व श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
युसुफवडगांव येथे 350 ते 375 वर्ष पुरतान श्रीराम मंदिर असुन दरवर्षी येथे श्रीराम नवमीला जन्मोत्सव सोहळा व याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.हा सोहळा पाहण्यासाठी व श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आजुबाच्या पंचक्रोशीतुन व मोठ्या संख्येने बाहेर गावाहुन भाविक भक्त येतात हा श्रीराम नवमी जन्मोत्सव व याञा महोत्सव 3 दिवस चालतो त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.त्या अनुशंगाने गत वर्षापासुन श्रीराम नवमी अर्थात मंदिरात प्रभु श्रीरामचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर श्रीराम ग्रुप पुणे व श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते याही वर्षी दि.29 मार्च रोजी रामजन्म सोहळ्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश गायके,बापुसाहेब भुसारी,बाळासाहेब लामतुरे,विकास जाधव,अनिल निकम,अनंत जाधव,बाळासाहेब सपकाळ,प्रसाद कुलकर्णी, अमोल थळकरी,महादेव मोडवे,छञुगन निकम,उमाकांत सौंदणे,गणेश रोडगे,दयानंद सातपुते व पञकार सचिन उजगरे यांनी परिश्रम घेतले.