#निधन वार्ता
ऍड. मोहनराव चिंचोलकर यांचे निधन…..!

केज दि.१ – तालुक्यातील जेष्ठविधीज्ञ ऍड. मोहनराव बापूराव चिंचोलकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते.
केज तालुक्यातील मूळ चिंचोली माळी येथील रहिवासी असलेले चिंचोलकर कुटुंब मागच्या कित्येक वर्षांपासून केज येथे स्थायिक आहे. मोहनराव चिंचोलकर हे एक निष्णात विधीज्ञ होते.जिल्ह्यात आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी कित्येकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी चार च्या सुमारास केज येथे राहत्या घरी मोहनराव यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी, ऍड.नितीन, डॉ. सचिन ही दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार आहे. सायंकाळी 7 वाजता क्रांतीनगर (कानडी रोड केज) स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.