#Corona
तब्बल एक वर्षानंतर केजच्या नावावर एका कोरोना रुग्णाची नोंद…..!
केज दि.२ – मागच्या काही महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक कमी झालेला होता. सर्वकाही पूर्वपदावर आलेले आहे. मात्र पुन्हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागलेले आहेत. आणि तब्बल एक वर्षाच्या विश्रांतीनंतर केज शहरातील एकजण कोरोना बाधित आढळून आला आहे.
संपूर्ण जगामध्ये कोरोनाने कसा उद्रेक केला होता हे सर्वश्रुत आहे. संपूर्ण जगाची घडी विस्कटलेली होती. मात्र लसीकरणामुळे आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजी मुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा संथ गतीने का होईना कोरोना डोके वर काढू लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दिवसेंदिवस रुग्णांची नोंद होत आहे. आणि मागच्या एक वर्षापासून एकही रुग्ण नसलेल्या केज तालुक्यामध्ये ही एका रुग्णाची नोंद झाल्याचा अहवाल आज समोर आला आहे. केज शहरातील धारूर रोडवरील एक 86 वर्षीय व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव आढळून आल्याची नोंद जिल्ह्याच्या दि.2 एप्रिल 2023 च्या कोरोना अहवालामध्ये झालेली असल्यामुळे नागरिकांनी सहज न घेता काळजी घेणे गरजेचे आहे.