#Accident
केज – अंबाजोगाई रोडवर अपघात, एकाचा मृत्यू…..!

केज दि.३ – सेवानिवृत्तीच्या तिसऱ्या दिवशी धारूर येथील पाटबंधारे कर्मचारी अनंतराव जाधव (58) यांचे होळ ता.केज जवळ अपघाती निधन झाले असून त्यांचे पार्थिव अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

धारुर शहरात सावली प्रतिष्ठाणच्या माध्यमाने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तथा पाटबंधारे खात्यात शासकीय सेवा देणारे अनंतराव जाधव समाजात सर्वपरिचित होते. आज दि.3 सोमवारी अंबाजोगाईकडे जात असताना त्यांच्या डॕटसन (Datsun) कंपनीची चारचाकी (क्र. एमएच 44- जी 3078) ब्रिझा सुझुकी या चारचाकीस धडकली. या अपघातात अनंतराव जाधव (58) यांचा जागीच मृत्यू झाले. अनंतराव जाधव हे दि.31 मार्च रोजीच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
दरम्यान, निवृत्तीनंतर ( retirement ) त्यांनी समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे ( Accidental death ) शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.
