#Accident
पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात…..!
पुणे दि.८ – देवदर्शन करून पुणे (Pune) शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसचा अपघात (Accident) झाला. सदरील गाडी तुळजापूरहुन (Tuljapur) निघाली होती. शनिवारी सकाळी हा अपघात झाला आहे. बसमध्ये ६० भाविक होते. त्यातील ३० जण जखमी झाले आहेत. अपघातात पुणे शहरातील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन ते तीन जण गंभीर जखमी (Serious injury) आहेत. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घाव घेत जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले.
दौंड तालुक्यातील मळद येथे हा अपघात झाला. मृत महिला पुणे शहरातील रहिवाशी आहे. तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन खासगी बस पुण्याकडे जात होती. बसमध्ये ६० प्रवाशी होते. बस पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune – Solapur Highway) असताना मळद गावाजवळ खड्ड्यात उलटली. या अपघातात तीस प्रवासी जखमी झाले. त्यात वृद्ध महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व भाविक हे पुणे शहरातील भवानीपेठ, लोहिया नगर परिसरातील आहेत. ते खासगी बसने तुळजापूर, येरमाळा येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते.
बस पुण्याकडे परतत असताना शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील मालाड घागरेवस्तीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडच्या मधोमध असलेल्या कल्व्हर्टवर उलटली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला आहे. जखमींना दौंड व भिगवण (इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.