#Accident

मिक्सर – दुचाकी अपघातात तरुण ठार, एक जखमी……!

6 / 100
केज दि.१३ – केज – मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी ( सारणी ) जवळील पुलाजवळ एचपीएम कंपनीच्या मिक्सरने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून दुसऱ्या तरुणावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
     केज तालुक्यातील येवता येथील नामदेव रघुनाथ साखरे ( वय २५ ) या तरुणाने मागील काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पिकअपचे कागदपत्रे आणण्यासाठी तो १२ एप्रिल रोजी सकाळी बीडला गेला होता. काम आटोपून नामदेव साखरे व कल्याण धनराज डोंगरे ( रा. कोठी ता. केज ) हे दोघे दुचाकीवरून ( एम. एच. ४४ व्ही. ३०५३ ) गावाकडे येत होते. केज – मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी ( सारणी ) जवळील पुलाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीच्या मिक्सरने ( एम. एच. १५ एफ. व्ही. ५१५६ ) जोराची धडक देऊन मिक्सर हा रस्त्याच्या एका बाजूला खाली पलटला. या अपघातात दुचाकीवरील नामदेव रघुनाथ साखरे व कल्याण धनराज डोंगरे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नामदेव साखरे या पाय मोडलेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर कल्याण डोंगरे याचा हात मोडला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
            दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जमादार अशोक मेसे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close