
केज दि.१६ – तालुक्यातील साळेगाव येथे गालफाडे यांच्या शेता जवळ मोटार सायकलला भरधाव वेगातील कारने समोरून धडक दिल्याने मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्या नंतर केज च्या दिशेने पळून गेला.
अधिक माहिती अशी की दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ४:१५ वा. च्या सुमारास कळंबकडून केजकडे जात असलेल्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या मोटार सायकलला क्र. (एम एच-२३/के-५३००) साळेगांव येथे गालफाडे यांच्या शेता जवळ धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार नंदकुमार जोगदंड, रा. भाटुंबा ता. केज हा गंभीर जखमी झाला आहे. कार चालकाने मात्र अपघात स्थळावरून पळ काढला.

दरम्यान, अपघाताची माहिती अरुण झाडबुके आणि जय जोगदंड यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशा वरून पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे त्या कारचा शोध घेत आहेत.