केज दि.31 – मागच्या कांही दिवसांपासून केज तालुक्यात पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र काल (गुरुवारी) शहरात एक रुग्ण पॉजिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी तालुक्यातील 38 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. तर काल एक रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केेेज शहरातील भवानी चौक परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील ज्या नागरिकांना कांही लक्षणे दिसून येत असतील तर त्यांनी तालुका आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.
डी डी बनसोडे
नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!