केज दि. 26 – शहरातील ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस च्या सभागृहात हेल्मेट नावाचा एक लघुपट (short film) एएसपी पंकज कुमावत यांच्या उपस्थितीत प्रदर्शित होत आहे.
केज सारख्या ग्रामिण भागातुन शैक्षणिक व सामाजिक प्रश्नावर लेखन करुन एका नव्या क्षेञात झेप घेत प्रवास करतांना हेल्मेट चा वापर करणे किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी केज मधील ज्ञानज्योती कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक ज्ञानेश कलढोणे पुढे सरसावले आहेत.नुकतेच त्यांच्या हेल्मेट या लघुचिञपटाचे चिञीकरण पुर्ण झाले असुन त्याचे प्रदर्शन (releasing ceremony) दि.27/4/2023 रोजी सांयकाळी सहा वाजता ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस,जाजू काॕम्प्लेक्स ,कानडी रोड येथे होणार आहे.
सदरील लघुपटाचे प्रदर्शन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पो.नि.बाळासाहेब पवार, उप निरिक्षक राजेश पाटील, बालरोगतज्ज्ञ डॉ.दिनकर राऊत, सक्रीय न्युज चे संपादक डी.डी.बनसोडे, डॉ.बी.जे हिरवे, सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले, प्रा.संतोष राऊत हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निर्माते व दिग्दर्शक प्रा.ज्ञानेश कलढोणे, कार्यकारी दिग्दर्शक रोषण एडके यांनी केले आहे.