#Accident
बैलाचे शिंग लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…!

केज दि. २ – बैलाचे शिंग लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील येवता येथे दोन मे रोजी सायंकाळी घडली आहे.
केज तालुक्यातील येवता येथील विष्णू नामदेव निर्मळ (५०) हे त्यांच्या शेतामध्ये असताना बैलाने त्यांना सिंग मारले आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.