राजकीय

भाजप नेते रमेश आडसकर यांची प्रदेश कार्यकरिणीवर वर्णी….!

9 / 100
केज दि.३ – आपल्या संघटन कौशल्याने बीड जिल्ह्यातील गावागावात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या रमेश आडसकर यांची भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणीवर सदस्य पदी निवड करण्यात आल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांच्या या निवडीने माजलगाव – केज मतदारसंघातून भाजप कार्यकर्ते, नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
              रमेश आडसकर यांनी बीड जिल्ह्यात आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला आहे. पक्षाचे विचार, संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न, स्थानिक संस्थेवरील त्यांची पकड या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितल्या जात आहे.
                भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार रमेश आडसकर यांची भाजपा प्रदेश कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close