राजकीय

भाजपच्या प्रदेश चिटणीस पदी प्रा.किरण पाटील…..!

किरण पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी....!

6 / 100
संभाजीनगर दि.३ – छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढलेले प्रा.किरण पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवत मराठवाड्यातील प्रमुख चार पदाधिकाऱ्यांमध्ये प्रा. किरण पाटील यांची वर्णी लावली असून त्यांचेवर आता पक्षाने प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.
              राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रा.किरण पाटील यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती मध्ये मराठवाड्यातून चार जणांना प्रदेश कार्यकारणी मध्ये चिटणीस पदावर संधी देण्यात आली. यामध्ये किरण पाटील यांची वर्णी लागल्याने संभाजीनगरसह सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पक्षाने दिलेली जबाबदरी चोख पार पाडणार – प्रा.किरण पाटील

          पक्षाने माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी दिली आहे. यापूर्वी देखील मला संभाजीनगर शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी पक्षाने व पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आणि आज मला पक्षाच्या महत्वपूर्ण असलेल्या कार्यकारणी मध्ये प्रदेश चिटणीस पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास व जबाबदारी मी पुढील काळात चोखपणे पार पाडेल असा विश्वास प्रा.किरण पाटील यांनी व्यक्त केला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close