#Social
एस.एम.देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप….!
केज दि.१३ – महाराष्ट्रात ज्यांना पत्रकारांचे आधारस्तंभ म्हणुन ओळखल्या जाणारे तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कानंसाठी सदैव लढा उभारणारे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य विजयराज आरकडे तथा जि. उपाध्यक्ष गौतम बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाना फळ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रामदास तपसे, अशोक सोनवणे, विनोद शिंदे, दत्तात्रय हांडिबाग, अजय भांगे, प्रकाश मुंडे, रमेश इतापे, सनी शेख इत्यादी पत्रकारांसह रुग्णालयाचे कर्मचारी श्रीकृष्ण नागरगोजे, महिला कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.