
बीड दि.५ – 12th Exam Result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंडळाने निकालाची माहिती सकाळी पत्रकार परिषदेतून केली. यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.
बारावीच्या परीक्षेत यंदा १४ लाख ८७हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची ८८ टक्के आहे. यंदा मंडळाच्या इतिहासात प्रथमच परीक्षा दहा दिवस आधी झाली त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला. कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत १२४
केंद्रांवर गैरमार्ग आढळले. ती सर्व केंद्र आता रद्द केली आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने अनेक उपाय केले, असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, यंदा बारावीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे. सन २०२२ या वर्षात ९४.२२ टक्के निकाल लागला होता. त्यानंतर २०२३ मध्ये ९१.२५ टक्के निकाल लागला होता. २०२४ मध्ये ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. तसेच या वर्षी २०२५ मध्ये ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल लागला असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.