हवामान
राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा…..!
केज दि.२९ – गेल्या काही दिवसांपासून उन्ह्याचा temperature पारा वाढतच चालला आहे. अशातच आता हवामान विभागाने एक महत्वपूर्ण अंदाज forecast वर्तवला आहे. पुढच्या आठवडाभरात मॉन्सून monson केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या rain सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबई देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकिकडे हवामान विभागाकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये गारपीटीची शक्यता आहे. तर, उत्तराखंडमध्ये तुफानी वारे नुकसान करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.