आरोग्य व शिक्षण

केज शहरात आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू….!

9 / 100

केज दि.३० – शहरातील क्रांती नगर भागामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही आरोग्यदायी योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्याच धर्तीवर शहरातील फुलेनगर भागामध्ये शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरील आरोग्य केंद्राचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.

                मागच्या काही दिवसांपूर्वी क्रांतीनगर भागामध्ये रुग्णांच्या सेवेमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे. सदरील दवाखान्यामध्ये दैनंदिन 30 ते 35 रुग्ण लाभ घेत आहेत. आणि इतर परिसरातील रुग्णांनाही आपल्या जवळच आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र शहरातील फुले नगर भागात केदार निवास या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. सदरील केंद्रावर एक एमबीबीएस डॉक्टर, नर्स, सेवक हे दुपारी दोन ते दहा वेळेत रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहेत. सदरील केंद्रामध्ये तपासणी, औषधी मोफत दिले जाणार आहेत आणि रक्त आणि लघवी तपासणीची ही सोय त्या ठिकाणी मोफत करण्यात आलेली आहे. रुग्णांना घराच्या जवळच उपचार घेता यावेत, दूरवरच्या दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने विविध आरोग्यदायी योजना राबवल्या जातात. त्याच अनुषंगाने सदरील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.
                तरी परिसरातील रुग्णांनी सदरील आरोग्य केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास आठवले यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close