#Social

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी नेता : रमेशराव आडसकर…..! 

8 / 100
बीड जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी नेता म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.रमेशराव आडसकर हे गेल्या काही दशकापासून हाबाडा फेम या नावाने ओळखले जातात.तसा हाबाडा हा शब्द आदरणीय तात्या स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या काळापासूनच प्रचलित झाला आहे.
त्यावेळी राजकीय नेते मंडळीना पराभूत केल्यानंतर “दिला रं दिला,”हाबाडा दिला,”अशी म्हणच प्रचलित झाली होती.त्या हाबाडयाला राज्यात नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यात नेऊन राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांचा राजकीय वारसा पुढे चालवणारे रमेशराव आडसकरांनी देखील बीड जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटलेला आहे.बीड  जिल्ह्यातील केज,अंबाजोगाई,धारूर, वडवणी, माजलगाव या पाच तालुक्यावर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करत राजकारणाची पकड मजबूत ठेवणारे रमेशराव आडसकर आजही तितक्याच ताकदीने राजकारणात टिकून आहेत.
सर्व सामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन पाचही तालुक्यावर आपले वर्चस्व कायम टिकवून जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा कायम ठेवला आहे. रमेशराव आडसकर आमदार व्हावेत अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.ती अपेक्षा लवकरच पूर्ण होवो हीच सदिच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना देऊयात.
                  रमेशराव आडसकरांना माजलगाव मतदारसंघातील जनतेनी एकवेळ नाकारले असले तरी जनतेच्या मनात कायम घर करुन असलेले रमेशराव आडसकरांना माजलगावची जनता एकवेळ तरी आमदार केल्याशिवाय  राहणार नाही.हेही तितकेच खरे आहे.रमेशराव आडसकर यांचेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे.सहकार क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्रात रमेशराव आडसकर यांचे मोठे योगदान आहे.बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अनेक गावात छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखा आहेत.अंबा सहकारी साखर कारखान्यावर आडसकरांचेच वर्चस्व कायम आहे.अंबा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत रमेश आडसकर व दत्ता पाटील यांनी एकत्र येऊन यंदाही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध काढत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.ही युती फक्त अंबा कारखान्या पुरतीच आहे का सक्रिय राजकारनावर युतीचा परिणाम होईल का ? यावर बरीच चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे.एक मात्र नक्की  राजकारणातील विरोधकांना ऐनवेळी सोबत घेऊन राजकीय कुरूक्षेत्रावरील लढाई जिंकण्याचे कसब  रमेशराव आडसकर यांच्या मध्ये आहे. हे त्यांनी अंबा कारखान्याच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे.सहकार महर्षी माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर साहेबांचा वारसा पुढे जोमाने नेहण्याचे काम रमेशराव आडसकर सााहेबांनी केेेले आहे.केज तालुक्याच्या नकाशातील छोटेसे गांव असलेल्या आडस या गांवाची संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे माजी आमदार स्व.बाबुराव आडसकर यांनी १९६४ मध्ये केज पंचायत समितीचे सभापती म्हणुन काम करतांना ग्रामिण प्रश्नांची खरी नस त्यांना सापडली होती.१९६० च्या दशकात दळणवळणाची सोय नाही.वृतपञाचा बोलबाला नाही.दुरसंचार माध्यमातुन फोनची सुविधा अपुरीच होती.अशा काळात संपुर्ण केज अंबाजोगाई परिसरात साहेबांनी सायकलवरुन फिरून परिसर पिंजुन काढला होता. हे विशेष खेडोपाडी आडसकरांनी आपला रुणानुबंध निर्माण केला.कुठलाही कार्यकर्ता असो त्याला त्याचे प्रश्न विचारुन त्याला सन्मानाने व समाधानाने ते काम करुनच परत पाठवत असत.त्यांच्या या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे व काम करण्याच्या धडाडीमुळे प्रत्येक गांवात त्यांच्या कामाचा ठसा निर्माण होत गेला.त्याचे बोलके उदाहरण म्हणजे १९७२ ची केज विधानसभेची निवडणुक होय.केजच्या सर्वसाधारण मतदार संघातुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आडसकरांना उमेदवारी मिळाली होती.तर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रसिध्द विचारवंत कै.बापुसाहेब काळदाते यांना उमेदवारी प्रजा समाजवादी पक्षाने दिली.या लढतीकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारत देशाचे लक्ष या लढतीकडे होते.अनेक राजकीय विचारवंत व पञकारांचे अंदाज खोटे ठरवत या मध्ये आडसकर साहेबांनी ३८४१६ मते घेवुन समाजवादी नेते काळदाते यांचा पराभव केला होता.अगदी देशाच्या संसदेतही काळदातेंना पाडणारा माणुस कोण आहे हा प्रश्न पडला होता. केजची ही निवडणुक मराठवाड्याच्या राजकीय  इतिहासात महत्वपुर्ण ठरली याचे कारण म्हणजे बाबुराव आडसकर साहेबांवर प्रेम करणारी ग्रामिण जनता होय.त्यांनी दिलेला हाबाडा हा शब्द कुठल्याही इलेक्शन मध्ये चर्चिला जात आहे .हा त्यांच्या बोली भाषेतला शब्द राजकारणात खुपच रुढ झाला आहे.कडक टोपी,भारदार मिश्या ,पांढराशुभ्र सदरा ,धोती व या बरोबरच जॕकेट घालुन वाड्यावर बसलेले साहेब,त्यांच्या शेजारी एक टेली फोन ,पान सुपारीचे तबक ,व समोर बसलेले पंचक्रोशीतील शेतकरी व शेतमजुर…! प्रश्न ऐकुन त्याच ठिकाणी तहसील ,एमइसिबी ,पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना फोन करुन प्रश्नांची सोडवणुक करत.चहा घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही याची ते काळजी घेत असत.म्हणुनच तर ते जनतेच्या मनात घर करुन राहिले होते.अनेकांची घर संसारे त्यांनी अंबाजोगाई सहकारी कारखान्याच्या माध्यमातुन फुलविली होती.त्याच बरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती ,श्री.छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन भुमी पुञांना न्याय देण्याचे काम केले.केज तालुक्यातच उच्च शिक्षण मिळावे म्हणुन वसंत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय केज शहरात उभे राहिले.त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मा.रमेशराव आडसकर यांनी केज येथे सीबीएसईची शारदा इंग्लीश स्कुल व वसंत पाॕलिटेक्निकची सुरूवात केली.केज ,अंबाजोगाई व धारुर तालुक्याच्या राजकारणात ग्रामिण भागातील शेतकरी व शेतमजुर यांचे प्रश्न घेवुन लढणारे माजी आमदार बाबुराव आडसकर यांचा वारसा जपणारेे रमेशराव आडसकर आजही सदैैैव कार्यकर्त्यांच्या गराडयातच असतात.अनेक संकटांंवर मात करतांना रमेशराव आडसकर जराही खचले नाहीत.कै.गोपीनाथ मुंडे व राज्याच्या माजी मंञी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आजही ते राजकारणात तितक्याच ताकदीने ते सक्रीय आहेत.त्यामुळेच बीड जिल्ह्याच्या राजकारणात
                   आजही त्यांचा तितकाच प्रभाव आहे.आजही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा !
(प्रासंगिक – श्रावनकुमार जाधव, जेष्ठ पत्रकार)

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close