ब्रेकिंग
दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली….!

पुणे दि.१ – इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचंच लक्ष लागलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. यावेळी शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल. तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले? राज्याचा एकूण निकाल किती लागला? परिमंडळ निहाय निकाल किती लागला? याची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.