राजकीय
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी गावागावात शिवसेना शाखा स्थापन करा…..!
केज दि.१० – शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाप्रमुख पदी (पुर्व) निवड झाल्यानंतर प्रथमच केज येथे दि.१० जुन २०२३ रोजी शासकीय विश्रामगृहात तालुका शिवसेनेची बैठक नवनियुक्त जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या उपस्थित संपन्न झाली.
सदरील बैठकीत जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई , शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर साहेब यांचे विशेष आभार मानले.
त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातून लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील धांडे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबूरे यांनीही केलेल्या सहकार्यबद्दल आभार व्यक्त केले. तसेच बैठकीत केज तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, वाहतूक सेना पदाधिकार, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांचे आभार मानून येणाऱ्या काळात शिवसेना शाखा प्रत्येक गावात स्थापन करून मा उद्धवजी ठाकरे साहेबांना साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण करावे असे आवाहन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी केले.
तर गेल्या २३ वर्षात शाखा सचिव ते जिल्हाप्रमुख अशा संघर्षमय काळाचा अनुभव पणाला लाऊन केज विधान सभा मतदार संघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून येईपर्यंत शिवसैनिकांनी माझ्या सोबत खंबीरपणे साथ द्यावी असे आवाहन केले. यावेळी अनेक पदधिका-याने बैठकीत भावना व्यक्त करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे वचन दिले.
यावेळी बैठकीला उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, दिपक मोराळे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव, जिल्हा संघटक अभिमान पटाईत, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, कॉलेजकक्ष जिल्हाप्रमुख किशोर घुले, शहरप्रमुख तात्या रोडे, महिला आघाडीच्या अश्विनी बडे,राऊत ताई, ढाकणे ताई, तालुका सचिव रामहरी कोल्हे,तालुका संघटक लक्ष्मण गालंडे, उपतालुका प्रमुख सुनील पटाईत, अभि घाटुळ, रोहित कसबे, सुभाष ठोंबरे, पप्पू ढगे, अमोल चौधरी, जहेद शेख, सुधीर जाधव, आत्तम घाडगे,हरीश गित्ते,मधु अंधारे,प्रकाश केदार, रमेश निंगुळे,रवि ठोंबरे, सखाराम वयबसे, राहुल जाधव, ज्योतिकांत काळसकर, प्रदीप काळे, दिलीप जाधव बाळू कसबे, शेळके सर सह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.