ब्रेकिंग

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह….!

9 / 100
 केज दि.१६ – एसटी आगारातील वाहकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. महादेव ज्ञानोबा धस असे मयताचे नाव असून धारूर आगारात ते वाहक म्हणून कार्यरत होते.
              अधिक माहिती अशी की, १५ जून रोजी धारूर एसटी आगारात वाहक असलेले महादेव ज्ञानोबा धस वय ३५ वर्ष रा. सारणी (सांगवी) यांचा सारणी (सांगवी) शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.सदरील घटनेचा  पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला आहे.
            महादेव धस यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सदरील घटनेचा तपास केज पोलीस करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close