हवामान

शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर इतरांसाठीही कामाची बातमी…..!

6 / 100
महाराष्ट्रात maharashtra कुठे ना कुठे वीज lightening पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या आपल्याला वारंवार समजतात. अलीकडे या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समजत आहे. तर जून-जुलै महिन्यात rainy season वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात जास्त घडतात. दरवर्षी अनेक शेतात काम करत असताना शेतकरी farmer आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं. त्यामुळेच भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं ‘दामिनी’ ॲप यापूर्वीच तयार केलं आहे. वादळ आणि वीज पडणं ही भारतातील सर्वांत मोठी धोकादायक नैसर्गिक आपत्ती natural calamity आहे, ज्यामुळे दरवर्षी 2000 हून अधिक मृत्यू होतात. पण आता तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या ॲपच्या माध्यमातून समजणार आहे.
            गुगल प्ले स्टोअरवर google play store ‘Damini : Lightning Alert’ असं सर्च करून तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता आणि पावसाळ्यात सुरक्षेसाठी वापरू शकता. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी ही स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेने 2020 मध्ये हे ॲप विकसित केलं आहे. संस्थेनं वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत.
            लाईटनिंग लोकेशन नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करून त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारं ठिकाण ओळखतो. हे ॲप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे Gps location तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे ॲप देतं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close