ब्रेकिंग

व्यापारी जागेसाठी केजमध्ये निघणार भव्य मोर्चा…..!

6 / 100
केज दि.२६ – शहरातील अतिक्रमण हटवल्यानंतर छोट्या व्यवसायिकांची कोंडी झाली आहे. भरमसाठ भाडे भरणे शक्य नसल्याने ते इतरत्र व्यवसाय करू शकत नाहीत. मागच्या पंधरा दिवसांपासून छोटे व्यापारी चिंतातुर आहेत.त्यामुळे त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी दिली आहे.
                 केज शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविल्यानंतर  छोटे व्यापारी व टपरिधारक व्यवसायिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असणारे व्यवसायिक व कुटुंबीय यांची प्रचंड उपासमार सुरू झाली आहे.  आता या व्यवसायिकांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. केज नगरपंच्यायत कडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. केजमध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा मुख्य रस्त्यालगत केवळ शासकीय विविध कार्यालयाच्या जागा आहेत. या  शासकीय जागेवर रस्त्यालगत नियम व अटी अंतर्गत गाळे काढून या व्यापाऱ्यांना शासकीय कायदे व नियमाच्या अधीन राहून हे गाळे किरायाने दिल्यास व्यवसायिकांची गरजही भागेल व शासनाला आर्थिक प्राप्तीही होईल.  यासाठी केज विकास संघर्ष समितीने अगदी पहिल्याच दिवशी केज पंच्यायत समितीकडे गाळे बांधण्यासाठी मागणी केली आहे.  याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शासनाने “बांधा-वापरा- हस्तांतरीत” करा या धोरणाचा अवलंब केला आहे. याची केजला खूप गरज आहे. या प्रस्तावाला गती देऊन येत्या सहा महिन्यात हे गाळे तयार व्हावेत व व्यावसायिकांना उपलब्ध करावेत या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने येत्या शुक्रवार दि 30 जून  रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य मोर्चाचे  आयोजन करत आहोत. शासनाला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी या मोर्चात केज शहरातील छोटे व्यापारी, टपरिधारक व अतिक्रमण उठल्यामुळे रस्त्यावर आलेले दुकानदार व त्यांच्या कुटुंबातील लोकांनी तसेच समाजप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले व नासेर मुंडे यांनी केले आहे.
              दरम्यान, मोर्चा तयारीसाठी विशेष बैठक मंगळवार दि 27 जून रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह केज येथे आयोजित केलेली असून जास्तीत जास्त लोकांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close