महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्ताच्या घडीची मोठी बातमी…..?

मुंबई दि.२ – राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप करणारी एक बातमी समोर आलेली आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राजभवनाकडे दाखल झाले असून त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे काही आमदारही आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही राजभवनावर दाखल झालेले आहेत. आज राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक होती. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार होती. मात्र अचानक ही बातमी समोर आली असून अजित पवार हे राजभवनावर दाखल झाले असून ते आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात की काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नऊ आमदार ही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे बोलल्या जात असून हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वर्षानंतर झालेला हा आणखी एक मोठा भूकंप आहे.