केवड ( ता. केज ) येथील ज्ञानेश्वरी प्रवीण जाधव या पतीसह ४ जुलै रोजी १०.३० वाजता देवदर्शनासाठी उत्तरेश्वर पिंप्री येथे गेल्या होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे जिन्यातील दरवाज्यास कुलूप लावले नव्हते. घरी कोणी नसल्याची संधी शेजारी कल्याण गोवर्धन जाधव व अल्का कल्याण जाधव या दाम्पत्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे लांब गंठण, १५ हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, ७ हजार रुपयांची एक सोन्याची अंगठी, बदाम, काड्या, ६ हजाराचे चांदीचे वाळे, चौन, साखळी ग्लास, वाटी, चांदीच्या बांगड्या, चांदीचा करंडा असे एकूण ८१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करीत ज्ञानेश्वरी जाधव यांनी तक्रार दिल्यावरून कल्याण जाधव व अल्का जाधव या दाम्पत्याविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बालासाहेब बांगर पुढील तपास करताहेत.