केज तालुक्यातील साळेगाव येथे शफी शेख नावाच्या कुटुंब प्रमुखाच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्न आज होणार आणि आदल्या दिवशी अचानक घराला आग लागली. मुलीच्या लग्नाचा बस्ता असेल किंवा इतर सामान असेल सर्व काही क्षणात जळून खाक झाले. अगोदरच प्रतिकूल परिस्थितीमधून सामानाची जुळवाजुळव केलेली होती. आणि त्यात मोठे संकट ओढवले. कुटुंबप्रमुख हाताश होऊन बसलेले असताना काही मदतीचे हात पुढे आले आणि थोडासा दिलासा मिळाला.
दरम्यान भाजपाचे युवा नेते विष्णू घुले हे नेहमीच अडचणीच्या वेळेस पुढे येतात त्याप्रमाणे विष्णू घुले यांनी अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला मदत देण्याचा निर्धार केला आणि मुलीच्या लग्नासाठी म्हणून आर्थिक मदत केली.