क्राइम

पुण्याची कोयता गॅंग पकडली केज तालुक्यात….!

10 / 100
केज दि.१३ – धारदार शस्त्राचा धाक दाखवून पुणे शहर आणि परिसरात दहशत माजविणारी कोयता गॅंग केज पोलिसांनी ताब्यात घेतली असून या धाडसी करवाई बद्दल पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या सकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १२ जुलै रोजी केज-बीड रोडवरील जोला सासुरा पाटीवरील राणा डोईफोडे यांच्या रेणू पेट्रोल पंपावर ॲड. प्रदीप ईतापे हे  त्यांच्या मोटार सायकलीमध्ये पेट्रोल भरीत असताना तेथे एका मोटार सायकल वर तीन अनोळखी तरुण आले त्यांनी ॲड. प्रदीप ईतापे यांना लातूरला जाण्याचा रस्ता विचारला आणि त्या नंतर त्यांनी त्यांच्याशी बाचाबाची झाली. ॲड. प्रदीप ईतापे यांनी ही माहिती केज पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व त्यांचे सोबत पोलीस नाईक शमीम पाशा आणि वाहतूक शाखेचे नितीन जाधव हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी त्यांनी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतले असता त्यांच्याकडून एक धारदार कोयते आणि स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ताब्यात घेतली. त्यांची अधिक चौकशी केली असता ते तिघे यशवंत कुमार उत्तम लोधी (रा. सोमेश्वरवाडी सावरकर पार्क पाषाण पुणे), गणेश एकनाथ मनाळे (रा. जवान शेख भट्टी, कुमार शांती निकेतनच्या बाजूला बालाजी चौक पाषाण, पुणे) आणि विशाल राजाभाऊ कांबळे (रा. एकनाथ नगर, पाषाण पुणे) हे असल्याचे निष्पन्न झाले.
                   पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांना ताब्यात घेतल्या नंतर त्यांनी पुणे एलसीबी शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही कोयता गॅंग असून त्यांनी पुणे शहर आणि परिसरात धारदार शस्त्र आणि कोयत्याची धाक दाखवून अनेक गुन्हे केले आहेत.
या प्रकरणी यशवंत कुमार उत्तम लोधी, गणेश एकनाथ मनाळे आणि विशाल राजाभाऊ कांबळे यांच्या विरुद्ध दि. १३ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
                दरम्यान,गुन्हेगारकडे धारदार शस्त्र असतानाही पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस नाईक शमीम पाशा आणि पोलीस नाईक नितीन जाधव यांनी अलौकिक धाडस दाखवून त्यांना जेरबंद केले या त्यांच्या धाडसा बद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close