केज दि.१७ – गाव करेल तो राव करेल काय ? असे म्हटले जाते. आणि याचाच प्रत्यय केज तालुक्यामध्ये आला आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून असलेली रस्त्याची दुर्दशा सरकार दरबारी थेटे घालून मिटली नाही. त्यामुळे ऊसतोड मजूर असलेल्या गावकऱ्यांनीच एकत्र येत आपल्या श्रमाचे पैसे गोळा केले आणि सुमारे दोन किलोमीटर चा रस्ता चालण्या लायक एक केला.
केज तालुक्यामध्ये अनेक गावे ही डोंगराळ भागांमध्ये आहेत. तिथे अद्यापही कसल्याही प्रकारच्या सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. एवढेच काय वीज, पाणी, रस्ता या अत्यावश्यक गरजाही सदरील गावकऱ्यांना पुरवणे सरकारला यश आलेले नाही. मात्र कित्येक वर्ष दगड, धोंडे, चिखल तुडवत सदरील भागात राहणारे नागरिक आयुष्य काढत आहेत. मात्र सरकारकडून योजना आपल्या गावापर्यंत येत नसतील तर वाट तरी किती पहायची असा विचार करून तालुक्यातील काळूचीवाडी गावच्या ऊसतोड मजूर ग्रामस्थांनी रस्ता करण्यासाठी कारखान्याहून परत आल्यानंतर जे काही श्रमाचे पैसे होते त्यातून थोडा थोडा हिस्सा गावकऱ्यांनी एकत्र केला आणि सुमारे दोन किलोमीटर चा रस्ता चालण्या लायक केला.
जेमतम हजारच्या आत लोकसंख्या असलेले हे गाव आणि त्यातही बहुतांश गावकरी हे ऊस तोडणी साठी बाहेरगावी जातात. मात्र ती ऊस तोडणीला गेल्यानंतर घरी वृद्ध आई-वडील, लहान लहान मुले शिक्षणासाठी ठेवलेले असतात. आणि अशा वृद्ध नागरिकांना आणि लहान लहान मुलांना त्या रस्त्यावरून चालणे कठीण झालेले होते. आणि म्हणूनच या त्रासातून मुक्त होण्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या श्रमाचे पैसे एकत्र केले आणि सर्वाच्या सहकार्याने दोन किलोमीटर चा रस्ता चालण्याला एक केला. हे पाहून तरी किमान स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग येईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.