#Social
ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने ४० सायकलींचे वाटप…..!
अंबाजोगाई दि.२४ – एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यातील भूमिहीन, शेतमजूर, घरेलू कामगार, विधवा, परित्यक्ता, ऊसतोड मजूर, एकल पालक व मूकबधिर, गरजवंत गोरगरीब विद्यार्थिनींना, आरोग्य क्षेत्रातील आशाताई, ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई, व डॉ.महेश नायकुडे यांच्या वतीने रविवार 23 जुलै रोजी अंबाजोगाई येथे सायकलींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नवी दिल्लीचे डॉ.महेश नायकुडे आपल्या भाषणात म्हणाले की, ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई चे कार्य ग्रामीण भागासाठी अत्यंत कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेत असताना येणाऱ्या समस्या व त्यांना दळणवळणाच्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसलेल्या विद्यार्थिनींना शालेय शिक्षण घेणे सोपे व्हावे या उद्देशाने त्यांना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी शरद झाडके, विद्याधर पाथरकर, भागवत मसने, सुनील मस्के, बळीराम चोपणे, युवराज काकडे, सुभाषराव सोनके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन मूकबधिर विद्यार्थी, दोन आशाताई वर्कर व दोन प्रातिनिधिक विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सचिव प्रा. भागवत गोरे, राहुल माळी, आप्पासाहेब वाघमोडे, दशरथ नथाडे, गोविंद शिंनगारे, संतोष आदुडे, सुरेश गोरमाळी, रमेश कुलकर्णी, प्रताप यादव, धनराज देवकते आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्योतीराम सोनके तर आभार प्रदर्शन संतोष राऊत यांनी मानले.