#Social

मनसैनिक पोहोचले मदत घेऊन प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या घरी….!

6 / 100
जळगाव (जा) दि.२८ – संग्रामपूर,शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष व संपर्क अध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार मदत घेऊन थेट पुरग्रस्तांच्या घरी पोहोचले.
             यामध्ये शेतकरी सेना जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे यांच्या नेतृत्वाखाली, प्रदिप भवर, जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना, विनोद खरपास,  तालुकाध्यक्ष, राजु राऊत, तालुकाध्यक्ष जळगाव जळगाव जामोद, नागेश भटकर, शहर अध्यक्ष शिवा खोंड, तालुकाध्यक्ष संग्रामपूर , आनंद सपकाळ तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना , गोपाल वानखडे शहर उपाध्यक्ष,वैभव येणकर शहर संघटक, प्रमोद येऊल , यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना,विद्यार्थी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्या वतीने दि.२७/०७/२०२३ ला पूरग्रस्तांना मदत व्हावी या साठी चिखली येथून आणलेले साहित्य गव्हाचे पीठ तीन क्विंटल,दोन क्विंटल तांदूळ,तेलाचे शंभर पाऊच,प्रत्येकी दोन साड्या,एक चादर, एक ब्लॅंकेट, लहान मुला, मुलींना दोन दोन ड्रेस, वडशिंगी ता. जळगाव जामोद येथील बाधित ४५ ते ५० पूरग्रस्तांच्या  कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रत्यक्ष भेटून  मदत दिली.
          तसेच वडशिंगी येथील पूरग्रस्त कुटुंबातील सदस्या साठी प्रशासनाच्या मदतीने विठ्ठलभाऊ लोखंडकार व शैलेश गोंधणे यांनी स्वतः लक्ष घालून  जेवण्याची व्यवस्था  करून दिली. संपुर्णपणे बाधित झालेल्या कुटुंबाची माहिती शैलेश काळे , उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद शितल सोलाट , तहसीलदार जळगाव जामोद,निवासी नायब तहसिलदार मुरलीधर गायकवाड, जळगाव जामोद यांच्याशी सविस्तर चर्चा करून खरे बाधित कोण व त्यांचे पर्यंत कसे पोहचता येईल याचे नियोजन करून साहित्य रुपी मदत केली.या पावसाने सर्वत्र हाहाकार झाला. महापुराने जवळपास १ लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे,बरीच शेत जमीन चक्क खरडून गेली.हजारो गुरे दगावली काही वाहून गेली आहेत. अनेक परिवार बेघर झाले आहेत. या व्यतिरिक्त कित्येकांच्या घराच्या भिंती खचल्या, घरातले अन्नधान्य, स्वयंपाकाची भांडी, कपडे सगळ काही पुरात वाहून गेले आहे. या दोन तालुक्यात पूराने मागील १०० वर्षांचा रेकॉर्ड तोडल्या गेला आहे.
                      या वेळी शैलेश गोंधणे, जिल्हा  संघटक शेतकरी सेना बुलडाणा, राजु राऊत, तालुकाध्यक्ष जळगाव जामोद, नागेश भटकर शहर अध्यक्ष शिवा खोंड,तालुकाध्यक्ष संग्रामपूर, आनंद सपकाळ तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना,वैभव येनकार शहर संघटक, प्रमोद येऊल, गोपाल वानखडे, शहर उपाध्यक्ष,अरुण धर्माळ,तालुका उपाध्यक्ष, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अरुण येवले,प्रसिद्धी प्रमुख ऋत्विक बिऱ्हाडे,शाळा समिती अध्यक्ष रामेश्वर मानकर,गजानन सावंत,दीपक मोरे,सुभाष  शिंदे,गणेश दाभाडे,पवन शेंडे, ज्ञानेश्वर खिरोडकर, पुरुषोत्तम वेरुळकर, अंकित इंगळे,मोहन धर्माळ, पवन कुमार खोंड, भास्कर हुरसाळ,कपिल चोपडे व इतर ग्रामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close