व्हायरल

बीड जिल्हा काँग्रेस च्या वतीने अनोखा आनंदोत्सव…..!

6 / 100
अंबाजोगाई दि.५ – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे आदरपुर्वक स्वागत केले. तसेच अंबाजोगाई शहरातील प्रमुख रस्त्यांवरून उंटावरून मिरवणूक काढून नागरिकांना 5 क्विंटल साखर वाटून आपला आनंद साजरा केला.
              बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख बोलताना सांगितले की, देशाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींना सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. न्यायमूर्ती गवई यांनी राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर राहुल गांधी यांच्या विरोधात महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व ही निलंबित करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांनी त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे या निकालानंतर आमचे नेते राहुल गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ती म्हणजे ‘ नफरत के खिलाफ सत्यमेव जयते, जय हिंद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. न्याय व्यवस्थेवरील आमचा तसेच सर्वसामान्य माणसाचा विश्‍वास आणखी दृढ झाला आहे. या निर्णयाने केंद्रातील भाजपाच्या दडपशाही महत्वकांक्षी, सत्तांध, स्वार्थी, संधी साधु, कपटनितीचे विघातक राजकारण शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून सुरू असलेले सत्ताकारणाला चपराक बसली आहे.
           बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाई शहरात शनिवार, दि.5 ऑगस्ट रोजी दुपारी शहरातील नवा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट रोड गुरूवार पेठ ते योगेश्वरी देवी मंदिर परिसरात या रॅलीचा समारोप झाला. राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कॉंग्रेसच्या वतीने प्रार्थनाही केली. प्रमुख रस्त्यांवरून वाजत गाजत, फटाके फोडून, राहूल गांधी आणि काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा देत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. आपल्या आनंदात त्यांनी सर्वसामान्य माणसांना सहभागी करून घेतले. उंटावरून 5 क्विंटल साखर वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
                         या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, हणूमंत मोरे, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंभुराजे देशमुख, संजय देशमुख, रविकांत सोनवणे, प्रविण देशमुख, अशोक देशमुख, संजय काळे, राहुल मोरे, बाळासाहेब जगताप, शेख मुख्तार, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  गणेश गंगणे, योगेश देशमुख, ऋषिकेश सोमवंशी, विनोद सोमवंशी, प्रविण खोडसे, महेश सोमवंशी, मधुकर गंगणे, आश्रूबा कस्पटे, आजू बागवान, अतुल सोमवंशी, शुभम साबळे, ओंकार घोबाळे, सुंदर देशमुख, महेश देशमुख, मनोज जाधव, चंद्रमणी वाघमारे, गणेश देशमुख, शेख अकबर भाई, किरण उबाळे, बाबुराव शिंदे, समद कुरेशी, विठ्ठल उबाळे, इर्शाद कुरेशी, अभिजीत उबाळे, अमजद कुरेशी, लखन उबाळे, सलमान बागवान, लखन अंजान, सोहेल शेख, ज्योतिराम अंजान, फेरोज शेख, आगु संगम, हमीद शेख, अल्ताफ कुरेशी, अजमेर शेख, राम शेलार, महेश चाटे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close