ब्रेकिंग

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर….!

9 / 100
मुंबई दि.११ – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला आहे.
                महाविकास आघाडी सत्तेत असताना नवाब मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आज अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दोन महिन्यांकरीता जामीन मंजूर झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close